Join us

T10 League: पहिल्याच षटकात प्रवीण तांबेने साजरी केली हॅट्ट्रिक

पहिल्याच षटकात प्रवीणने हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 20:11 IST

Open in App
ठळक मुद्देचौथ्या चेंडूवर प्रवीणने इऑन मॉर्गनला बाद केले. पाचव्या चेंडूवर कायरन पोलार्डचा काटा प्रवीणने काढला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर फॅबियन अॅलेनचा काटा काढत प्रवीणने हॅट्ट्रिक साजरी केली.

शारजा, टी-10 लीग : ख्रिस गेलसारख्या फलंदाजाला दुसऱ्याच चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम सिंधीस संघातील मुंबईकर प्रवीण तांबेने केली आहे. पहिल्याच षटकात प्रवीणने हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. टी-10 लीगमध्ये पाच बळी मिळवणारा प्रवीण हा पहिला गोलंदाज ठरला आहे.

केरला किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रवीणने किंग्ज संघाचा निर्णय पहिल्याच षटकात चुकीचा ठरवला आहे.

 

 

 

प्रवीणने दुसऱ्याच चेंडूवर गेलचा काटा काढला, यावेळी गेलला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर चौथ्या चेंडूवर प्रवीणने इऑन मॉर्गनला बाद केले. पाचव्या चेंडूवर कायरन पोलार्डचा काटा प्रवीणने काढला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर फॅबियन अॅलेनचा काटा काढत प्रवीणने हॅट्ट्रिक साजरी केली. मुख्य म्हणजे या चारही फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे पहिल्या षटकात सिंधीस केरला किंग्ज संघाची 4 बाद 6 अशी दयनीय अवस्था होती.

टॅग्स :टी-10 लीग