शारजा, टी-10 लीग : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगाल टायगर्सने पंजाबी लिजंड्स संघावर सहा विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. बंगाल टायगर्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पंजाबी लिजंड्स संघाला 10 षटकांमध्ये फक्त 77 धावाच करता आल्या.
बंगालच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केला. त्यामुळेच बंगालला लिजंड्स संघाला 77 धावांमध्ये रोखता आला. बंगालकडून मुजीब उर रेहमानने फक्त 11 धावांमध्येच दोन बळी मिळवले.
लिजंड्सच्या आव्हानाचा सहज पाठलाग बंगालच्या संघाने केला. बंगालकडून जेसन रॉयने 14 चेंडूंत 43 धावांची तडफदार खेळी साकारली. या खेळीमध्ये सहा चौकार आणि तीन षटकार लगावले.