Join us

T10 League : मराठा संघावर बंगाल टायगर्स भारी, पटकावले तिसरे स्थान

T10 League: बंगाल टायगर्सने टी-10 लीगमधील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात मराठा अरेबियन्सवर 6 विकेट व 5 चेंडू राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 21:13 IST

Open in App

शारजा, टी-10 लीग : बंगाल टायगर्सने टी-10 लीगमधील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात मराठा अरेबियन्सवर 6 विकेट व 5 चेंडू राखून सहज विजय मिळवला. मराठा संघाचे 122 धावांचे आव्हान बंगालने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

हझरतुल्लाह जझाई ( 39) आणि अॅडम लिथ ( 52) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मराठा अरेबियन्सने 6 बाद 121 धावा उभ्या केल्या. अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे अरेबियन्सना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कामरान अकमल, ड्वेन ब्राव्हो, रशीद खान यांना आज अपयश आले. बंगाल टायगर्सच्या अली खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.122 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग बंगाल टायगर्सने अगदी सहज केला. सुनील नरीनने 11 चेंडूंत 15 धावा करून तंबूची वाट धरल्यानंतर मुहम्मद उस्मान ( 28) आणि शेर्फान रुदरफोर्ड ( 46) यांनी संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला.  बंगाल टायगर्सने 6 विकेट् व 5 चेंडू राखून सहज विजय मिळवला. 

 

टॅग्स :टी-10 लीग