Join us  

T-20 World Cup : अखेर पाकिस्तान झुकला, संघाच्या जर्सीवर 'india' नाव टाकलंच

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाच्या संबधामुळे दोन्ही संघ एकमेकांचे दौरे करत नाहीत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांत त्यांची लढत लक्षणीय असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 5:43 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाच्या संबधामुळे दोन्ही संघ एकमेकांचे दौरे करत नाहीत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांत त्यांची लढत लक्षणीय असते.

नवी दिल्ली - उद्यापासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकाकडे (ICC T20 World Cup) संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. या स्पर्धेतील सर्वात मोठी लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. मात्र, पाकिस्तानाच्या संघाने जर्सीवर भारताऐवजी युएईचे नाव टाकले होते. त्यावरुन, भारतानेही कडक भूमिका घेतल्यामुळे आता पाकिस्तानला नमते घ्यावेच लागले.  

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाच्या संबधामुळे दोन्ही संघ एकमेकांचे दौरे करत नाहीत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांत त्यांची लढत लक्षणीय असते. आता, 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधी भारत-पाक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, पाकिस्तानच्या जर्सीवरुनच पाकच्य संघाची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या जर्सीवर यजमान असणाऱ्या भारताच्या (India 2021) जागी सामने पार पडणार असलेल्या युएईचं (UAE 2021) नाव लिहिलं आहे. विशेष म्हणजे इतर सर्व संघानी भारताचं नाव लिहिलं असतानाही पाकिस्तानने अशाप्रकारे भारताचा द्वेष करण्यासाठी हे कृत्य केलं. मात्र, आता पाकिस्तानच्या संघाला तो निर्णय बदलावा लागला आहे. पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची नवीन जर्सी जारी केली आहे. त्यामध्ये, इंडिया हे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळेच, इच्छा नसताही पाकिस्तानच्या खेळाडूंना इंडिया लिहिलेली जर्सी घालूनच मैदानात उतरावे लागणार आहे. 

पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर यापूर्वी 'ICC Men's T20 World Cup UAE' असे नाव लिहिले होते. त्यावर, बीसीसीआयने हरकत घेतली, त्यामुळे पीसीबीला आपला निर्णय बदलावा लागला. त्यामुळे, आता नव्या जर्सीवर 'ICC Men's T20 World Cup India', असे नाव लिहिण्यात आले आहे. अखेर, भारताच्या दबावापुढे पाकिस्तानला नमावेच लागले. 

सर्वच संघांच्या जर्सीवर इंडिया हे नाव

यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा होस्ट भारत असून बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. या स्पर्धेतील सर्वच सामने भारतात होणार होते, पण कोरोना महामारीच्या संकटामुळे हे सामने आता युएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआय आणि आयसीसीने त्यास मान्यता दिली आहे. केवळ येथील स्पर्धेचं ठिकाण बदललं आहे. मात्र, होस्ट भारतच आहे. त्यामुळे, प्रत्येक संघाच्या जर्सीवर 'ICC Men's T20 World Cup India' असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या जर्सीमध्ये त्यांचा कर्णधार बाबर आजमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर, काही नेटकऱ्यांनी याबाबत ट्विट केलं. तसेच, पाकिस्तानच्या संघाला भारत लिहावेच लागेल, असेही म्हटले होते. त्यानंतर, बीसीसीआयनेही कडक भूमिका घेत, पीसीबीला इंडिया लिहिण्यास भाग पाडले. 

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे. तर, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  

टॅग्स :पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतबीसीसीआय
Open in App