Join us  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतने असा साकारला होता रील लाईफमधला धोनी, क्लायमॅक्समधील तो सिन ठरला अविस्मरणीय

गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 7:53 PM

Open in App

मुंबई - बॉलिवूडमधील तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेविश्व् हादरून गेले आहे. एक गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका. सुशांतसिंह राजपूतने या भूमिकेमध्ये अक्षरश जीव ओतून रिअल लाईफमधला धोनी रिल लाईफमधील पडद्यावर जिवंत केला होता.

या चित्रपटातील क्लायमॅक्स सिन असलेल्या २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील क्षेवटच्या क्षणांचे चित्र सुशांतने हुबेहूब धोनीस्टाईल सिक्स मारून उभे केले होते. त्यामुळे आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो तेव्हा भारताने विश्वचषक जिंकल्याचा फिल येतो.

सुशांतसिंह राजपूतच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. रियल लाईफमधला धोनी रील लाईफमध्ये पडद्यावर साकारणे तितकेसे सोपे नव्हते. त्यासाठी सुशांतने फिटनेसवर मेहनत घेतली होती. धोनीचे हावभाव, त्याच्या फलंदाजीची स्टाईल आत्मसात केली होती. इतकेच नव्हे तर धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळण्यामध्येही त्याने हातखंडा मिळवला होता. त्याची चुणूक त्याने या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनममध्ये दाखवली होती. 

ही मेहनत फळाला आली. एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट सुपरहिट झाला होता. तसेच १००० कोटींचा व्यवसाय करणारा सुशांतसिंह राजपूतचा हा पहिला चित्रपट ठरला होता.  

 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतआत्महत्याबॉलिवूडमहेंद्रसिंग धोनी