Join us

Sushant Singh Rajput : "तुझ्या जाण्याचं दुःख अजूनही कायम आहे, परंतु सत्याचा विजय होईल!" 

Sushant Singh Rajput : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानंही एक ट्विट केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 14:58 IST

Open in App

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. 

... हा तर ठाकरे सरकारला जबरदस्त झटका; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानंही एक ट्विट केलं. त्यानं लिहिलं की,'' तुझ्या जाण्याचं दुःख अजूनही कायम आहे, परंतु मला हे माहित्येय की सत्याचा विजय होणार.''

रैनानं नुकतीच जाहीर केली निवृत्तीरैनानं 2018मध्ये अखेरचा वन डे  व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

टॅग्स :सुरेश रैनासुशांत सिंग रजपूत