ICC T20 World Cup 2026, Team India Big Win vs Zimbabwe At Chepauk : गत चॅम्पियन टीम इंडियाने चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात ७२ धावांसह मोठ्या विजयाची नोंद केली. फलंदाजीतील क्लास शोच्या जोरावर भारतीय संघाने सेमीफायनलची आस कायम ठेवली . दुसरीकडे सुपर ८ मधील सलग दुसऱ्या पराभवासह झिम्बाब्वेचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
टीम इंडियाचा फलंदाजीत सुपर हिट शो नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर अभिषेक शर्मा ५५ (३०) आणि हार्दिक पांड्याच्या ५० (२३) अर्धशतकाशिवाय तिलक वर्मा ४४ (१६), संजू सॅमसन २४ (१५), ईशान किशन ३८ (२४), सूर्यकुमार यादव ३३ (१३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २५६ धावा करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाच्या फलंदाजीतील हिट शोसमोर झिम्बाब्वेचे गोलंदाज अक्षरश: हतबल ठरले.
IND vs ZIM : अभिषेक शर्माचा संघर्ष संपला! झिम्बाब्वेविरुद्ध साजरे केलं वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक
ब्रायन बेनेटची दमदार खेळी, शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ब्रायन बेनेट याने ५९चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली. पण भारताविरुद्धची खेळी खास ठरली. कारण त्याने ही खेळी ८ चौकारांसह ६ षटकारांनी बहरली होती. त्याच्याशिवाय झिम्बाब्वेच्या कर्णधाराने २१ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला मोठी धावसंख्या करता आली नाही.
गोलंदाजीत अर्शदीपचा जलवा! जसप्रीत बुमराहची पाटी कोरी
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्रत्येक बॅटरनं आपली भूमिका चोख बजावताना संघाच्या धावफलकावर विक्रमी धावसंख्या लावली. त्यानंतर गोलंदाजीत अर्शदीप सिंगचा जलवा पाहायला मिळाला. अर्शदीपनं ४ षटकात २४ धावा खर्च करत संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबेनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली. जसप्रीत बुमराहसह हार्दिक पांड्या विकेटलेस राहिला.
Web Summary : India defeated Zimbabwe convincingly, fueled by strong batting performances from Sharma and Pandya. Arshdeep's bowling led India to a dominant victory by 72 runs, pushing them closer to the T20 World Cup semi-finals after setting a huge score of 256.
Web Summary : भारत ने शर्मा और पांड्या के शानदार प्रदर्शन से ज़िम्बाब्वे को हराया। अर्शदीप की गेंदबाजी की बदौलत भारत ने 72 रनों से शानदार जीत दर्ज की, और 256 का विशाल स्कोर खड़ा करके टी20 विश्व कप सेमीफाइनल की ओर कदम बढ़ाया।