Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : ६५ दिवसांनी झाली भेट; सूर्यकुमार यादव अन् त्याच्या पत्नीनं लंडनच्या रस्त्यावर केला डान्स!

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेहून थेट लंडन येथे दाखल झाला अन् क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो अन् सलामीवीर पृथ्वी शॉ हे टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 17:37 IST

Open in App

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेहून थेट लंडन येथे दाखल झाला अन् क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो अन् सलामीवीर पृथ्वी शॉ हे टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाले. सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभागी होण्याचा आनंद झालाच, शिवाय त्याला त्याच्या पत्नीलाही भेटता आले. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दुखापतग्रस्त झाल्यामुळे मायदेशी परतले अन् त्यांना बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयनं सूर्यकुमार व पृथ्वी यांना लंडन दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंका दौऱ्यावर असताना कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ८ भारतीय खेळाडूंमध्ये पृथ्वी व सूर्यकुमार यांचाह समावेश होता. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते लंडनसाठी रवाना झाले. श्रीलंका दौऱ्यावर सूर्याकुमारला त्याच्या पत्नीला सोबत घेऊन जाता आले नव्हते आणि त्यानंतर लंडन दौऱ्याचे बोलावणे आले. त्यामुळे त्याची पत्नी देविका शेट्टी ही टीम इंडियाच्या अन्य सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसोबत लंडन दौऱ्यावर आधीच दाखल झाली होती. 

त्यामुळे सूर्यकुमारनं क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला अन् त्याला पत्नी देविकाचीही भेट घेता आली. ६५ दिवसांनंतर दोघंही एकमेकांना भेटले. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजानं लंडनच्या रस्त्यावर पत्नीसोबत डान्स करत आनंद साजरा केला. सूर्यकुमारनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे,  

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२० पर्वात देविका मुंबई इंडियन्सच्या बायो बबलमध्ये होती आणि त्यानंतर पार पडलेल्या १४व्या पर्वाच्या पहिल्या टप्प्यातही ती आयपीएल बायो बबलमध्ये अन्य खेळाडूंच्या कुटुंबीयांसोबत होती.  

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App