Join us
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांना महेंद्रसिंह धोनीने दिली अचानक भेट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:44 IST

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंह धोनीची आर्मी पब्लिक स्कूलला अचानक भेटचिनार कॉर्प्सने धोनीच्या स्कूलच्या भेटीचे काही फोटोज केले शेअर भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नलचे मानद पद

श्रीनगर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले. भारतीय लष्काराच्या चिनार कॉर्प्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. चिनार कॉर्प्सने महेंद्रसिंग धोनीच्या स्कूलच्या भेटीचे काही फोटोज शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये महेंद्रसिंह धोनी विद्यार्थ्यांनी संवाद करताना दिसत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच खेळणेही तितकेच महत्वाचे आहे, असा संदेश यावेळी महेंद्रसिंह धोनीने दिल्याचे चिनार कॉर्प्सने म्हटले आहे.

 दरम्यान, यापूर्वीही महेंद्रसिंह धोनीने जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन लष्करातील सैनिकांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, महेंद्रसिंह धोनीला क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे 2011 साली भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नलचे मानद पद दिले आहे. हे पद आणि रँकिंग मिळवणारा कपिल देवनंतर महेंद्रसिंह धोनी दुसरा क्रिकेटर आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारतीय जवान