मँचेस्टर - भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा याच्या खांद्यावर मँचेस्टर येथे BCCI च्या देखरेखीत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. BCCI ने आपल्या ट्विटरवर साहाचा फोटो पोस्ट केला आहे आणि वृद्धीमानला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय
क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात योग्य उपचार न मिळाल्यामुळे साहाचा खांदा दुखावल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर BCCI ने त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या दुखापतीमुळे साहाला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.