Join us

Suresh Raina Workout with Mace, Video: 'गदाधारी' सुरेश रैना! हातात वजनदार गदा घेऊन Mr IPL चं वर्कआऊट!!

रैनाचा हा व्हिडीओ भरपूर चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:57 IST

Open in App

Suresh Raina Workout with Mace, Video: जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या IPL चा १५वा हंगाम नुकताच संपला. या सीझनमध्ये मिस्टर आयपीएलच्या नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना खेळताना दिसला नाही. त्याने समालोचक म्हणून नवी इनिंग लीलया पेलली. पण आता मात्र रैना एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आहे. सुरेश रैनाचा गदा घेऊन वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचेही दिसत आहे.

सुरेशा रैनाचा गदा घेऊन वर्कआऊट, पाहा व्हिडीओ-

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो गदा घेऊन व्यायाम करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, गदा बजरंगबली सारखी दिसते. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, थलायवा मी पण तुझ्यासोबत येऊ शकतो का? अनेक युजर्सनी या व्हिडिओवर हार्टचा इमोजीही पोस्ट केला आहे. त्याचवेळी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, आताही धोनी तुम्हाला संघात घेणार नाही.

--

--

--

मेगा ऑक्शनमध्ये रैना राहिला UNSOLD

सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेआधी करारमुक्त केले. त्यानंतर २ कोटींची मूळ किंमत असलेल्या सुरेश रैनाला कोणीही मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतले नाही. रैनाने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते. रैना त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.त्यामुळेच आयपीएल २०२२ मध्ये सीएसके संघाला सुरेश रैनाची उणीव भासली. CSKला यंदाच्या हंगामात १० सामने गमवावे लागले.

टॅग्स :सुरेश रैनाआयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्स
Open in App