Join us  

सँडविच खात होतो अन् धोनी म्हणाला फलंदाजीसाठी तयार राहा; सुरेश रैनान सांगितला किस्सा

2015च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रैनाला मिळाली बढती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 5:45 PM

Open in App

टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत असताना महेंद्रसिंग धोनीच्या हुकूमी खेळाडूंमध्ये सुरेश रैनाला आघाडीचे स्थान होते. धोनीच्या पाठिंब्याच्या जोरावर सुरेश रैनानं टीम इंडियासाठी अनेक मॅच विनिंग खेळी केल्या. धोनीनं अनेकदा त्याच्या नेतृत्वकौशल्यानं प्रतिस्पर्धींना चकीत केलं आहे. रैनानं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील असाच एक किस्सा सांगितला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील तो मजेशीर किस्सा आहे.

त्या सामन्यात विराट कोहलीनं 126 चेंडूंत 107 धावांची खेळी केली होती. भारतानं तो सामना 76 धावांनी जिंकला होता. या सामन्यात रैनानं 56 चेंडूंत 74 धावा चोपल्या होत्या, परंतु कोहलीच्या शतकासमोर त्या झाकोळल्या गेल्या. पाच वर्षांनंतर रैनानं या मॅचमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. त्यानं या खेळीचं श्रेय धोनीला दिले.

पाकिस्तानी गोलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी धोनीनं रैनाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा ( 15) स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहली आणि शिखर धवन ( 73) यांनी 129 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसरी विकेट गेली आणि रैना मैदानावर आला. अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणं पाकिस्तानी गोलंदाजांना अपेक्षित होते. पण, धोनीनं रैनाला पाठवले.  

''मी त्याला कधीच प्रश्न विचारला नाही. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात मी सँडविच किंवा काहीतरी खात होतो. 20 षटकांनंतर अचानक धोनी जवळ आला आणि मला पॅड अप व्हायला सांगितले. मी लगेच पॅड बांधून तयार झालो. विराट चांगला खेळत होता आणि थोड्या वेळात धवन धावबाद झाला. त्यानंतर मी मैदानावर गेलो आणि 70-80 धावा केल्या,'' असे रैनानं सांगितले.रैनानं 74 धावांच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकार खेचले आणि भारताला 300 धावांचा डोंगर उभा करून दिला. पाकिस्तानला 224 धावा करता आल्या. सामन्यानंतर रैनानं धोनीला त्याला चौथ्या क्रमांकावर का पाठवले, असा प्रश्न विचारला. त्यावर धोनी म्हणाला,''पाकिस्तानच्या लेग स्पिनर्सविरुद्ध तू चांगली फलंदाजी करशील असं मला वाटलं. '' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार

चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video

सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव

Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग  

गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली 

पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?

टॅग्स :सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध पाकिस्तान