Join us

Suresh Raina IPL 2022 CSK vs KKR Live Updates: सुरेश रैनाचा CSKच्या फॅन्सबरोबर कल्ला; सोशल मीडियावर फोटो व्हायरल; चाहते भावनिक

सुरेश रैनाची कॉमेंटेटर म्हणून नवी इनिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 18:17 IST

Open in App

Suresh Raina IPL 2022 CSK vs KKR Live Updates: आय़पीएल स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. यंदाच्या IPL मध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. पण या हंगामात एक मोठी गोष्ट म्हणजे Mr IPL अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला यावेळी खेळताना पाहायला मिळणार नाही. मेगालिलावात सुरेश रैनाला कोणीही विकत घेतलं नाही. त्यानंतर यंदाच्या हंगामापासून सुरेश रैना IPL मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. तशातच रैनाने आज कॉमेंट्री क्षेत्रात पदार्पण करताच त्याचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसले. पाहा काही व्हायरल झालेले फोटो आणि नेटकऱ्यांच्या भावना-

--

--

--

--

--

दरम्यान, आज चेन्नईचा संघ कोलकाताविरूद्ध मैदानात खेळणार आहे. यंदाच्या हंगामापासून रविंद्र जाडेजा संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या आधी महेंद्रसिंग धोनी याने गेल्या वर्षीपर्यंत संघाचे नेतृत्व केले. पण दोन दिवसांपूर्वी CSK ने  जाडेजा नवा कर्णधार असल्याची मोठी घोषणा केली. आता यंदा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली CSK चा संघ कसा खेळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App