Join us  

Suresh Raina Retirement: सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Suresh Raina Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या पावलावर पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 8:32 PM

Open in App

महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे  व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की,''धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळाच होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद.''Suresh Raina Retirement 

रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.  Suresh Raina Retirement:

(सविस्तर वृत्त लवकरच)

टॅग्स :सुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघ