Join us

Super Six scenarios: वेस्ट इंडिज बाद, श्रीलंका पास! पण इतरांचं काय? एका जागेसाठी झिम्बाब्वेसह ३ स्पर्धक

Super Six scenarios: वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेवरील विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान पक्के केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:53 IST

Open in App

Super Six scenarios: वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेवरील विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान पक्के केले आहे. आता एका जागेसाठी चुरस रंगणार आहे. १९९६च्या विजेत्या श्रीलंकेने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखताना ८ गुणांसह सुपर सिक्समध्ये अव्वल स्थान पक्के केले. पण, या पराभवामुळे झिम्बाब्वेची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे आणि अन्य संघांना संधी चालून आली आहे. पात्र ठरणे हे सर्वस्वी झिम्बाब्वेच्या हातात आहे आणि त्यांना आता केवळ दोन गुम कमवायचे आहेत.  सुपर सिक्समधील अव्वल दोन संघ भारतात वर्ल्ड कप खेळायला येतील.  दोन वेळचा विजेत्या वेस्ट इंडिज या शर्यतीतून आधीच बाहेर फेकले गेले आहेत.

श्रीलंका ( पात्र ठरले)

  • सुपर सिक्स सामने खेळले - ४
  • विजयी झाले - ४ (  ओमान, स्कॉटलंड, नेदरलँड्स, झिम्बाब्वे) 
  • सुपर सिक्समधील गुण - ८
  • नेट रन रेट - +१.८१७
  • उर्वरित सामना - वेस्ट इंडिज ( ७ जुलै)  

 

झिम्बाब्वे 

  • सुपर सिक्स सामने खेळले - ४
  • विजयी झाले - ३ (  ओमान, नेदरलँड्स, वेस्ट इंडिज )  
  • सुपर सिक्समधील गुण - ६
  • नेट रन रेट - +०.०३० 
  • उर्वरित सामना - स्कॉटलंड ( ४ जुलै)   

झिम्बाब्वेने या स्पर्धेत धमाका उडवून दिला आहे. श्रीलंकेविरुद्धचा पराभव वगळल्यास झिम्बाब्वेने सर्व लढती जिंकल्या आहेत, परंतु आता त्यांना स्कॉटलंडविरुद्धची लढत जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करण्याची संधी आहे.  

स्कॉटलंड 

  • सुपर सिक्स सामने खेळले - ३
  • विजयी झाले - २ (  ओमान, वेस्ट इंडिज) 
  • सुपर सिक्समधील गुण - ४
  • नेट रन रेट - +०.१८८
  • उर्वरित सामने -  झिम्बाब्वे ( ४ जुलै), नेदरलँड्स ( ६ जुलै)  

स्कॉटलंडला या दोन्ही लढती जिंकून श्रीलंकेपाठोपाठ वर्ल्ड कप तिकिट निश्चित करण्याची संधी आहे. झिम्बाबेविरुद्ध विजय मिळवल्यास ते त्यादिशेने एक पाऊल टाकतील, परंतु झिम्बाब्वेने विजय मिळवल्यास ते पात्र ठरतील. मग सर्व स्पर्धक आपोआप बाद होतील.  

नेदलँड्स

  • सुपर सिक्स सामने खेळले - ३
  • विजयी झाले - १ ( वेस्ट इंडिज) 
  • सुपर सिक्समधील गुण - २
  • नेट रन रेट - -०.५६०
  • उर्वरित सामने - ओमान ( ३ जुलै), स्कॉटलंड ( ६ जुलै)  

नेदरलँड्सने सुपर सिक्समध्ये वेस्ट इंडिजवर थरारक विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत आणि त्या जिंकून त्यांचे ६ गुण होतील. पण, त्यांना झिम्बाब्वे व स्कॉटलंड यांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. शिवाय नेट रन रेट हा फॅक्टर त्यांच्यासाठ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकाझिम्बाब्वेवेस्ट इंडिज
Open in App