सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची सीईओ आणि आयपीएल फ्रँचायझी सह-मालकीण काव्या मारन हिने ही पहिल्यांदाच चाहत्यांमध्ये चर्चेत असलेल्या गोष्टीवर बोलली आहे. IPL सामन्यांदरम्यान सनरायझर्सचा संघ मैदानात उतरल्यावर स्टँडमध्ये तिची उपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेली तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीस्समुळे ती लक्षवेधी ठरताना पाहायला मिळाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL वेळी चर्चेत राहणारा चेहरा
काव्या मारन आपल्या संघाला चीअर करण्यासाठी जवळपास प्रत्येक सामन्यावेळी स्टेडियमवर हजेरी लावते. संघाच्या दमदार कामगिरीवर तिच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू अन् आनंदाच्या भरात तिने स्टेडियम स्टँडवर मारलेल्या उड्या. संघाच्या पराभवानंतर पडलेला चेहरा अन् ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना दिलेले प्रेरणादायी भाषण या वेळी काव्या मारनची दिसणारी खास झलक सोशल मीडियावर चांगलीच गाजली. संघाला मनापासून चीअर करते, असे सांगत तिने आपल्या व्हायरल मीम्सवर भाष्य केले आहे.
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
मी कुठंही असले तरी तो मला शोधतोच!
फॉर्च्यून इंडियाला दिलेल्या मुलाखतीत काव्या म्हणाली की, "जे तुम्ही पाहता त्या माझ्या वास्तविक भावना आहेत. हैदराबादमध्ये मी काहीच करू शकत नाही. मला तिथं बसावेच लागते. पण ज्यावेळी संघासोबत अहमदाबाद किंवा चेन्नईला जाते त्यावेळी दूर असलेल्या बॉक्समध्ये जरी बसलेली असले तरी कॅमरामन मला शोधतोच. त्यामुळे मीम्स का व्हायरल होतात ते लक्षात येते", असे म्हणत खेळाची आवड असल्यामुळेच कॅमेरामनच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते, असे ती मी म्हणाली आहे.
मॅच वेळीच नाही तर लिलावात संघ बांधणीवेळीहीअसते सक्रीय
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २०१६ मध्ये जेतेपद पटकावले होते. याशिवाय २०१८ आणि २०१४ मध्येही संघ फायनल खेळताना दिसला होता. मॅच वेळी संघाला चीअर करणारी काव्या मारन ऑक्शन टेबलवरही संघ बांधणीसाठी पुढाकार घेताना पाहायला मिळाले आहे. SRH संघाशी कनेक्ट झाल्यापासून क्रिकेट हा तिच्या प्रोफेशनचा एक महत्त्वाचा भागच झाल्याचे दिसून येते.