वेस्ट इंडीजचा स्टार गोलंदाज सुनील नारायणची इतिहासात नोंद झाली. टी-२० क्रिकेटमध्ये एका संघाकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. सुनील नारायणने कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना आतापर्यंत २०८ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, एका संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहूयात.
सुनील नरायण व्यतिरिक्त ही विशेष कामगिरी इंग्लिश क्रिकेटपटू समित पटेलच्या नावावर देखील नोंदवली गेली आहे. ज्याने नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबसाठी खेळताना एकूण २०८ विकेट्स मिळवले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वूड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने हॅम्पशायरकडून खेलताना १९९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा चौथ्या आणि इंग्लीश क्रिकेटर डेव्हिड पायने पाचव्या क्रमांकावर आहे. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सकडून खेळताना १९५ विकेट्स घेतल्या आहेत. तर, पायने याने ग्लूस्टरशायरसाठी १९३ विकेट्स मिळवले आहेत.
एका संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजसुनील नारायण- २०८ विकेट्स (कोलकाता नाईट रायडर्स)समित पटेल- २०८ विकेट्स (नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब)क्रिस वूड- १९९ विकेट्स (हॅम्पशायर)लसिथ मलिंगा- १९५ विकेट्स (मुंबई इंडियन्स)डेव्हिड पायने- १९३ विकेट्स (ग्लूस्टरशायर)
दिल्लीविरुद्ध नारायणची दमदार कामगिरीआयपीएलच्या ४८ व्या सामन्यात दिल्लीविरुद्ध सुनील नारायणने उल्लेखनीय कामगिरी केली. या सामन्यात त्याने १६ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना चार षटकांत २९ धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.