Join us  

इम्रान खान यांच्या शपथविधीला गावस्कर जाणार नाहीत, दिले हे कारण...

पाकिस्तानचे माजी कसोटीपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी दिग्गज कसोटीपटू सुनील गावस्कर जाणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 3:10 PM

Open in App

मुंबई - पाकिस्तानचे माजी कसोटीपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी दिग्गज कसोटीपटू सुनील गावस्कर जाणार नाहीत. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत बाजी मारली. इम्रान यांनी शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवले होते. यापैकी कपिल आणि सिद्धू हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला पाकिस्तानात जाता येणार नसल्याचे गावस्कर यांनी एका वाहिनीला सांगितले, परंतु त्यांनी इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,'स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याकडून इम्रान खानसारखे प्रयत्न झालेले नाहीत. नव्या नेतृत्त्वाखाली बदलाचे वारे वाहत आहेत, अशी आशा मी सध्यातरी करू शकतो. क्रिकेटपटूने एखाद्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणे, ही अभिमानास्पद बाब आहे.'

गावस्कर आणि इम्रान यांनी 1971 साली आपापल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली. गावस्कर यांनी 1987 साली निवृत्ती स्वीकारली. पण, इम्रानने 1992 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर क्रिकेट सोडले आणि राजकारणात सक्रिय झाले. दोघांनी एकमेकांविरूद 1987 साली अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यात भारताला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र हा सामना स्मरणात राहिला तो गावस्कर यांच्या 96 धावांच्या खेळीने.

टॅग्स :सुनील गावसकरइम्रान खानपाकिस्तानक्रिकेटक्रीडा