Join us  

Sunil Gavaskar on Umran Malik, IPL 2022: उमरान मलिकला Team India च्या प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे- सुनील गावसकर

उमरानच्या भेदक माऱ्यापुढे भलेभले फलंदाज ‘फेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 4:10 PM

Open in App

Sunil Gavaskar on Umran Malik Team India, IPL 2022: 'गुजरात टायटन्स'च्या संघाने अटीतटीच्या लढतीत शेवटच्या चेंडूवर सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) विजय मिळवला. राशिद खान (११ चेंडूत नाबाद ३१) आणि राहुल तेवतिया (२१ चेंडूत नाबाद ४०) यांनी शेवटच्या चार षटकांत ५६ धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. गुजरात (Gujarat Titans) संघाने शेवटच्या ६ चेंडूत २२ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या २२ वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने अप्रतिम गोलंदाजी करत २५ धावांत पाच बळी घेतले. उमरानने भेदक मारा केला असला तरी त्याच्या संघाला विजय मिळवून देणं त्याला जमलं नाही. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र त्याची तोंडभरून स्तुती केली.

भारतीय महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी गुजरात टायटन्सविरुद्ध पाच विकेट घेणारा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सामन्यानंतर त्याची प्रशंसा केली. “उमरान हा आता IPL मध्ये हिट झालाय. त्याच्यापुढे आता भारतीय संघात निवडलं जाणं हे आव्हान असणार आहे. सध्या त्याची संघात निवड झाली तरी त्याला कदाचित मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यामुळे प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे. पण इतर बड्या खेळाडूंसोबत त्याने दौरा केला तर त्याला संघाचा अंदाज येणं सोपं जाईल. त्यामुळे त्याला संघात संधी द्यायलचा हवी”, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला.

उमरान मलिकने संपूर्ण हंगामात नियमितपणे १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली आहे. ८ सामन्यांमध्ये त्याने १५.९३च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. वेगवान मारा करणाऱ्या उमरानने २०व्या षटकात एकही धाव न देता ३ बळी आणि एक रन आऊट करण्याचा कारनामा ही यंदाच्याच हंगामात केला आहे. त्याच्या वेगाने साऱ्यांना प्रभावित केलं असून त्याला लवकरच भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे असं ट्वीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही केले होते.

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App