Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गैरफायदा घेणाऱ्यांना संघाबाहेर काढा!" IPL आधी सुनील गावसकर कोणावर भडकले? जाणून घ्या कारण

नेमकं काय म्हणाले गावसकर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:29 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला (Indian Premier League) २८ मार्च पासून सुरुवात होत आहे. १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच अनेक परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड दोघेही दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. याशिवाय काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव उशीरा संघात जॉईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

त्यांना संघाबाहेर काढा

IPL साठी वेळेवर संघाच्या ताफ्यात दाखल न होणाऱ्या परदेशी खेळाडूंवर लिटल मास्टर सुनील गावसकरांनी   निशाणा साधला आहे. IPL स्पर्धा तोंडावर असताना बहाणेबाजी करणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर काढा, असा सल्लाच त्यांनी IPL फ्रँचायझी संघ मालकांना दिला आहे.

IPL फॅन पार्कची घोषणा; 15 शहरांमध्ये घ्या स्टेडियमसारखा अनुभव, नागपूर आणि रत्नागिरीचाही समावेश

नेमकं काय म्हणाले गावसकर?

‘स्पोर्टस्टार’साठी लहिलेल्या स्तंभ लेखातून सुनील गावसकर यांनी परदेशी खेळाडूंवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय की, काही परदेशी खेळाडू IPL फ्रँचायझी संघाला हलक्यात घेतात. ते दुखापत किंवा वैयक्तिक कारणे सांगून वेळेवर उपलब्ध होत नाहीत. फ्रँचायझी मालक खेळाडूंच्या सर्व सोयीसुविधांची काळजी घेतात. अनेकदा खेळाडूंच्या कुटुंबियांनाही स्वतःच्या खर्चाने भारतात बोलावतात, जेणेकरून खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. ही भारतीय पाहुणचाराची परंपरा असली, तरी काही खेळाडू यालाच आपला हक्क समजून त्याचा गैरफायदा घेतात, असे गावकर यांनी म्हटले आहे. 

कठोर भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही 

गावस्कर पुढे म्हणाले की, संघ निवडताना काही खेळाडू त्यांच्या अनुपलब्धतेबद्दल स्पष्ट माहिती देत नाहीत. स्पर्धा जवळ आली की, वेगवेगळी कारणे पुढे केली जातात. त्यामुळे फ्रँचायझींनी कठोर भूमिका घेत अशा खेळाडूंना संघाबाहेर करण्याचा विचार केला पाहिजे. कारण या गोष्टीचा संघाच्या रणनितीवर परिणाम होतो. सर्व नियोजन कोमडून पडते. याचा फ्रँचायझी संघाला मोठा फटका बसू शकतो, असे गावसकरांनी म्हटले आहे.  

आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी सर्व फ्रँचायझी संघाने सराव शिबीराच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली आहे. काही परदेशी खेळाडू अजूनही संघात दाखल झालेले नाही. न्यूझीलंडचा लॉकी फरग्यूसन हा फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला असून तो IPL च्या सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. मिचेल सँटनरही वर्कलोड मॅनेजमेंटमुळे वेळेत IPL फ्रँचायझीच्या ताफ्यात सामील झालेला नाही.  जॉश इंग्लिस लग्नामुळे बहुतांश सामन्याला मुकणार आहे.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sack Players Exploiting IPL! Gavaskar Angry Before Season Start

Web Summary : Sunil Gavaskar urges IPL franchises to drop players who exploit the system by arriving late or feigning injuries. He highlights the disruption to team strategy and the financial burden on franchises caused by these players' unprofessional conduct.
टॅग्स :आयपीएल २०२६सुनील गावसकरबीसीसीआयइंडियन प्रीमिअर लीगआयपीएल २०२४