Join us

सुलक्षण कुळकर्णी मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

सुलक्षण कुळकर्णी हे स्थानिक क्रिकेटमधील ओळखीचे नाव आहे. त्यांनी यापूर्वी तीन सत्र मुंबई संघाला प्रशिक्षण दिलेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 03:34 IST

Open in App

मुंबई : माजी यष्टिरक्षक सुलक्षण कुळकर्णीने मुंबई रणजी ट्रॉफी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दिला आहे. सूत्रानी ही माहिती दिली. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) विविध पदासांठी अर्ज मागविले आहेत. त्यात पुरुष संघाचे प्रशिक्षक, निवड समिती सदस्य व अन्य प्रशिक्षकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईचे एक अन्य यष्टिरक्षक फलंदाज विनायक सामंत यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. ते गेल्या दोन सत्रात संघाचे प्रशिक्षक होते. सुलक्षण कुळकर्णी हे स्थानिक क्रिकेटमधील ओळखीचे नाव आहे. त्यांनी यापूर्वी तीन सत्र मुंबई संघाला प्रशिक्षण दिलेले आहे.

टॅग्स :मुंबईरणजी करंडक