Join us

Suhana Khan Expressions, IPL 2022 KKR vs PBKS Live: सुहाना खानही झाली अवाक्... मैदानात असं घडलं तरी काय? जाणून घ्या

सुहाना आर्यन आणि अनन्यासोबत संघाला चिअर करत असताना हा प्रकार घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 00:20 IST

Open in App

Suhana Khan Expressions, IPL 2022 KKR vs PBKS Live: पंजाब विरूद्धच्या सामन्यात कोलकाताने सहज विजय मिळवला. १३८ धावांचे माफक आव्हान KKR ने अवघ्या १४.३ षटकांत पार केले. यात मोलाचा वाटा उचलला ऑलराऊंडर आंद्रे रसलने. रसलच्या फलंदाजीचा पंजाबला तुफान दणका बसला. रसलने सामन्यात ३१ चेंडूमध्ये ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा कुटल्या. त्यामुळे त्याच्या खेळीची चर्चा झालीच. पण त्यासोबतच बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता संघाचा मालक शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान हिचा एक फोटो बराच चर्चेत राहिला.

शाहरूखची मुलगी सुहाना, मुलगा आर्यन खान आणि त्यांची मैत्रिण बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे सर्व जण सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये हजर होते. या सामन्या दरम्यानचा सुहानाचा एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. त्या फोटोत कोणत्या तरी गोष्टीमुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. हा फोटो नक्की कधीचा आहे, त्यावेळी नेमकं काय झालं होतं ते आम्ही तुम्हाला सांगतो.

सामना सुरू असताना घडला प्रकार-

कोलकाताच्या गोलंदाजीच्या वेळी सामन्यातील १९वे षटक टाकण्यासाठी आंद्रे रसल आला. त्यावेळी कगिसो रबाडा फटकेबाजीच्या मूडमध्ये होता. त्याने ३ षटकारांच्या साथीने पंजाबच्या संघाची लाज राखत त्यांना १३०चा टप्पा गाठून दिला होता. पण रसलच्या गोलंदाजीवर रबाडाला चेंडूचा अंदाज आला नाही. त्यामुळे रबाडाने मारलेला चेंडू हवेत उंच गेला आणि त्यावेळी टीम साऊदीने अतिशय चपळाईने आणि अत्यंत चलाखीने तो चेंडू झेलला. व्हिडीओ पाहा.

टीम साऊदीने झेल घेण्यासाठी केलेले प्रयत्न खरंच खूपच कौतुकास्पद पण तितकेच आश्चर्यचकित करणारे होते. त्याने झेल घेतल्यानंतर तो त्याच वेगाने जमिनीवर आदळला पण त्याने हातातला चेंडू सुटू दिला नाही. त्याचा हा झेल पाहून सारेच चाहते आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. नेमका त्यावेळीच फोटोग्राफरने सुहाना खानचा तो फोटो टिपला.

विजयानंतरचं सेलिब्रेशन-

टॅग्स :आयपीएल २०२२सुहाना खानकोलकाता नाईट रायडर्सआर्यन खानअनन्या पांडे
Open in App