Join us  

धान्याची पोती उचलता उचलता कार्तिक घडला; जखमेवरील उपचारासाठी वडिलांनी विकली जमीन

उत्तर प्रदेशच्या हापूडमधील धानोरा या लहानशा खेड्यातील या खेळाडूच्या वाटचालीला संघर्षाची किनार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला कार्तिक जखमी झाला त्यावेळी वडिलांनी काही जमीन विकून त्याच्यावर उपचार केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 9:46 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘बालपणी वडिलांना शेतीच्या कामात मदत करणारा कार्तिक त्यागी अंगणात खेळता खेळता क्रिकेटकडे वळला. शेतीची सर्व कामे करणे पिकवलेल्या धान्याची पोती बस आणि ट्रॅक्टरमध्ये भरून बाजारापर्यंत पोहोचविणे आदी कामात तरबेज असलेला कार्तिक पुढे क्रिकेटमध्ये आला. 

उत्तर प्रदेशच्या हापूडमधील धानोरा या लहानशा खेड्यातील या खेळाडूच्या वाटचालीला संघर्षाची किनार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला कार्तिक जखमी झाला त्यावेळी वडिलांनी काही जमीन विकून त्याच्यावर उपचार केले होते. क्रिकेटमधील सुरुवातीत कार्तिकला जखमांविरुद्ध संघर्ष करावा लागला. दिल्लीत अनेक डॉक्टरांकडे त्याने फेऱ्या मारल्या. दोन महिन्यांत जखम बरी होईल, असे डॉक्टर सल्ला देत असत, मात्र जखम बरी होत नसल्याने तो  बेंगरुळूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. तेथे स्वत: खर्च करावा लागल्याने वडिलांनी त्याच्यासाठी शेती विकली. 

अखेरच्या षटकात ६ हून कमी धावांचे यशस्वी संरक्षण करणारा त्यागी दुसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्स, ब्रेट ली यांच्याकडून कौतुकमागच्या सत्रात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने कार्तिकचे कौतुक करीत त्याला भविष्यातील ब्रेट ली असे संबोधले होते. कार्तिक ब्रेटसारखा रनअप घेतो आणि इशांत शर्मासारखा चेंडू टाकतो,’ असे स्टोक्सने स्वत:च्या पोस्टमध्ये लिहिले होते. ब्रेट लीने देखील कार्तिकची पाठ थोपटताना त्याची शैली माझ्यासारखीच आहे, असे म्हटले होते.

 १९ वर्षांखालील विश्वचषकात ११ बळी२०२०च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात कार्तिकने ६ सामन्यात ३.४५ च्या सरासरीने ११ गडी बाद केले होते. स्पर्धेत तो भारताचा दुसरा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला.  येथूनच कार्तिकला खरी ओळख लाभली. यानंतर आयपीएल २०२० च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने या युवा गोलंदाजाला १ कोटी ३० लाख रुपये देत स्वत:कडे घेतले.

कार्तिकच्या क्रिकेटला सुरुवात घराच्या अंगणात झाली. त्याच्यातील उत्साह पाहून मी हापूड क्रिकेट अकादमीत नेले. तेथे कोच विपिन वत्स यांनी गोलंदाजीवर भर देण्याचा सल्ला दिला. कार्तिक    कामावर फोकस करीत असल्यामुळे आज तो वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास आला आहे.    - कार्तिकचे वडील योगेंद्र 

आयपीएलमध्ये मागच्या वर्षी मुंबईविरुद्ध पदार्पण करणाऱ्या राजस्थानच्या त्यागीने अखेरच्या षटकात कमाल केली. त्याने चार धावांचा बचाव करीत दोन फलंदाज बाद केले आणि पंजाबच्या तोंडचा घास हिसकावला. 

टॅग्स :कार्तिक त्यागीभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२१
Open in App