Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टुअर्ट ब्रॉडची गरूडझेप; आयसीसी कसोटी क्रमवारीत पटकावले तिसरे स्थान

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटीत शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 04:31 IST

Open in App

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटीत शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडने तिसरी आणि अखेरची कसोटी २६९ धावांनी जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली होती. सामन्यात ६७ धावात दहा गडी बाद करणाºया ब्रॉडने ५०० बळींचा टप्पादेखील गाठला. या कामगिरीच्या बळावर त्याने आॅगस्ट २०१६ नंतर सर्वोत्कृष्ट स्थान पटकवले. ३४ वर्षांच्या या गोलंदाजाने पहिल्या डावात ४५ चेंडूत वेगवान ६२ धावा केल्या होत्या. यामुळे फलंदाजी क्रमवारीत सात स्थानांचा त्याला लाभ झाला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही तो आता ११ व्या स्थानावर आला.ब्रॉडने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकले. ब्रॉडच्या खात्यात सध्या ८२३ गुण आहेत. होल्डर ८१० गुणांसह पाचव्या स्थानी घसरला आहे.भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीतही घसरण झाली असून सातव्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरला आहे. बुमराहच्या खात्यात सध्या ७७९ गुण जमा आहेत.कर्णधार विराट कोहली हा फलंदाजांमध्ये स्टीव्ह स्मिथनंतर दुसºया स्थानी कायम असून चेतेश्वर पुजारा सातव्या आणि अजिंक्य रहाणे नवव्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा तिसºया आणि रविचंद्रन अश्विन पाचव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)नाणेफेक जिंकूनही फलंदाजी न घेण्याचा फटका बसलावेस्ट इंडिजने दुसºया आणि तिसºया कसोटीत नाणेफेकीचा कौल बाजूने येऊनही फलंदाजीचा निर्णय घेतला नव्हता.पहिला सामना जिंकल्यानंतरही बचावात्मक पवित्रा घेण्याच्या नादात मालिका गमवावी लागली. आमचा संघ निश्चिंत झाला होता. पुढील दोन्ही सामने अनिर्णित राखून मालिका जिंकू, असा समज झाला. नेमका याचाच लाभ इंग्लंडने घेतला. नाणेफेक जिंकूनही तुम्ही फलंदाजी घेतली नाही, याचा अर्थ बचावात्मक पवित्रा असाच होतो. मालिका जिंकण्याचे श्रेय इंग्लंडला दिले पाहिजे.’ -कर्टनी वॉल्श500 बळी घेणे सोपे नाही-युवराजनवी दिल्ली : ‘कसोटीत ५०० बळी घेणे सोपे नाही,’ या शब्दात डावखुरा माजी फलंदाज युवराजसिंग याने वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचे कौतुक केले आहे. युवराज आणि ब्रॉड यांच्यातील द्वंद्व अनेकांना आठवत असेल. २००७ च्या टी-२० विश्वचषकात युवराजने ब्रॉडच्या षटकात ६ चेंडूवर ६ षटकार ठोकत विक्रम केला होता. ब्रॉडची कारकीर्द संपण्याचा त्यावेळी धोका निर्माण झाला होता. परंतु ब्रॉडने कामगिरीत सातत्याने सुधारणा केली. ब्रॉड इंग्लंडच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. युवराजनेही ब्रॉडच्या या कामगिरीचे कौतुक करताना त्या सहा षटकारांचा उल्लेख करू नका, ‘५०० बळी घेणे सोपे नाही,’ असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :इंग्लंडइंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज