Join us

गल्ली ते स्टेडीयम... आता इंडियन टेनिस क्रिकेट लीग अवतरणार

गल्लीतील क्रिकेटपटूंना मोठं व्यासपीठ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 17:20 IST

Open in App
ठळक मुद्देकृष्णा सातपुते लीगमध्ये सहभागी होणार.

मुंबई : मुंबईतलं गल्ली टेनिस क्रिकेट प्रसिद्ध आहे. गल्ली क्रिकेटमध्ये चांगली गुणवत्ता असते, पण ती गुणवत्ता जास्त लोकांना पाहता येत नाही. कारण हे क्रिकेट फक्त गल्लीपुरतं सिमीत असतं. पण आता या गल्ली क्रिकेटला मोठं व्यासपीठ मिळणार आहे. कारण आता अवतरणार आहे इंडियन टेनिस क्रिकेट लीग. या लीगमध्ये टेनिस क्रिकेटमधला नामांकित खेळाडू कृष्णा सातपुतेबी सहभागी होणार आहे.

आतापर्यंत टेनिस क्रिकेट आणि ते खेळणाऱ्या खेळाडूंच्या पदरी उपेक्षाच पडते. त्यामुळे  इंडोएशियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि स्ट्रीट स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. यांनी एकत्रितपणे  इंडियन टेनिस क्रिकेट लीग भरवण्याचे ठरवले आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची लीग होणार आहे. 

" या लीगशी संलग्न होण्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आयटीसीएल संघाबरोबर करार केल्यानंतर माझा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतातील प्रतिभावान खेळाडूंसाठी ही लीग मोठे व्यासपीठ आहे, " असे कृष्णा सातपुते म्हणाला. 

टॅग्स :क्रिकेटक्रीडा