Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडकडून देण्यात येणारा पुरस्कार बेन स्टोक्सने नाकारला, कारण...

इंग्लंडला पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सला ‘New Zealander of the Year’ या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:12 IST

Open in App

लंडन : इंग्लंडला पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सला ‘New Zealander of the Year’ या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. बेनचा जन्म हा न्यूझीलंडचाच, परंतु तो इंग्लंडे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर बेनला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं. पण, बेनने हा पुरस्कार न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनला द्यावा, अशी विनंती केली आहे. 

न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्चा येथे बेनचा जन्म, परंतु वयाच्या 12व्या वर्षापासून तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यानं न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला होता. त्यानं 98 चेंडूंत 84 धावांची महत्त्वाची खेळी केली होती. शिवाय त्यानं सुपर ओव्हरमध्ये 8 धावाही केल्या होत्या. तो म्हणाला,'' न्यूझीलंडकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा आनंद आहे. पण, मी या पुरस्कारासाठी माझ्यापेक्षा अनेक चांगली माणसं न्यूझीलंडमध्येच आहेत. ज्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे मी या नामांकनातून माघार घेत आहे.'' बेनने वर्ल्ड कप स्पर्धेत 10 डावांत 465 धावा केल्या.   बेनसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यालाही या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे आणि बेनने हा पुरस्कार विलियम्सनलाच मिळावा, असे मत व्यक्त केले आहे.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बेन स्टोक्सइंग्लंडन्यूझीलंड