Join us  

स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या घरात दुःखद घटना घडली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:01 AM

Open in App

जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाच्या संकटाशी सर्वच जण मुकाबला करत आहेत. पण, या संकटात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या घरात दुःखद घटना घडली आहे. स्मिथनं इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून ही बातमी सांगितली.

स्मिथचा पाळीव कुत्रा चार्ली याचे नुकतेच निधन झाले. त्यानं चार्लीसोबतचा फोटो पोस्ट करून ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली. त्यानं लिहीले की,''आमच्या कुटुंबातील लहान सदस्याला निरोप देताना खुप दुःख होत आहे. तो प्रेमळ, प्रामाणिक होता. त्याची मला नेहमी आठवण येत राहील. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.''  बॉल टॅम्परींग प्रकरणात एका वर्षांची शिक्षा पूर्ण करून मैदानावर परतलेल्या स्मिथनं अॅशेस मालिका गाजवली. त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि ऑस्ट्रेलियाला अॅशेस आपल्याकडे राखण्यात हातभार लावला. चार्लीच्या जाण्यानं स्मिथच्या पत्नीलाही दुःख झालं आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यास्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलिया