Join us  

स्टीव्हन स्मिथची बॅट तळपली, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली

एका वर्षांच्या बंदीनंतर राष्ट्रीय संघात परतलेल्या स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे अर्धशतक झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:54 PM

Open in App

ब्रिस्बेन : एका वर्षांच्या बंदीनंतर राष्ट्रीय संघात परतलेल्या स्टीव्हन स्मिथने शुक्रवारी न्यूझीलंड एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद 91 धावांची खेळी केली. त्याला ग्लेन मॅक्सवेलने 70 धावांची वादळी खेळी करून ऑस्ट्रेलिया एकादश संघाचा विजय पक्का केला. पावसानं झोडपलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार पाच विकेट राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने 50 षटकांत 9 बाद 286 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 44 षटकांत 5 बाद 248 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमामुसार ऑस्ट्रेलियाचा संघ 16 धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. डेव्हीड वॉर्नरला या सामन्यात उस्मान ख्वाजासह सलामीला संधी मिळाली, परंतु अवघ्या दोन धावा करून तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मिथने संयमी खेळ करतान ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. त्याला शॉन मार्श ( 32) आणि मॅक्सवेल ( 70) यांनी उत्तम साथ दिली. स्मिथने 108 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 91 धावा केल्या. मॅक्सवेलने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 70 धावा कुटल्या. स्मिथने याआधीच्या सामन्यात 89 धावांची खेळी केली होती. त्याने सराव सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावत आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अन्य संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.वर्ल्ड कप साठीचा ऑस्ट्रेलियाच संघ - अ‍ॅरोन फिंच, जेसन बेहरेनडोर्फ, अ‍ॅलेक्स करी, नॅथन कोल्टर नायल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९आॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ