Steve Smith Announces Retirement : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथ याने वनडेतून निवृत्तीची घोषणा केलीये. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील कांगारूंना १४ वर्षांनी भारताने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत गारद करण्याचा पराक्रम करून दाखवला. दुबईतील या पराभवानंतर स्मिथनं लगेच वनडे कारकिर्दीतून निवृतीतीची घोषणा केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंदीची शिक्षा अन् पुन्हा मिळाली होती कॅप्टन्सीची संधी, पण..
कॅप्टन्सीत मोठा डाग लागल्यावर पुन्हा त्याला कॅप्टन्सीचा मान मिळाला होता. पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली. बॅटिंगमध्ये त्याने आपलं कर्तत्व दाखवलं. पण संघाला जिंकून देण्यात एक कॅप्टन म्हणून तो कमी पडला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याने हार मानली अन् वनडेला फुलस्टॉप दिलाय.
तो 'डाग' लागला, अन्...
स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण कॅप्टनच्या रुपात त्याला छाप सोडता आली नाही. उलट २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बॉल टेम्परिंग प्रकरणात त्याच्यासह ऑस्ट्रेलियन संघाची नाचक्की झाली होती. बंदीच्या कारवाईनंतर त्याला कॅप्टन्सीची संधी मिळणे जवळपास मुश्किलच वाटत होते. संधी मिळाल्यावर साखळी फेरीतील दमदार कामगिरीसह त्याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियानं सेमीपर्यंत मजल मारली. पण इथं संघाचा प्रवास संपला. दुबईच्या मैदानातील ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवासासोबतच स्मिथची वनडे कारकिर्दही संपली.
वनडे कारकिर्दीतील कामगिरी
स्टीव्ह स्मिथनं आपल्या वनडे कारकिर्दीत १७० सामन्यात ५८०० धावा केल्या आहेत. यात १२ शतकांची नोंद आहे. तो २०१५ आणि २०२३ वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग राहिला होता. वनडे कारकिर्दीत १६४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Web Title: Steve Smith Announces Retirement ODI Following Australia's Semi-Final Loss to India in Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.