Join us  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करा : बीसीसीआय

बीसीसीआय आग्रही असले तरी याबाबत अद्याप आमच्याशी अधिकृत चर्चा केलेली नाही,’ असे ईसीबीने शुक्रवारी स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 7:25 AM

Open in App

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएल सामने खेळविण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले असून, आयपीएलसाठी वेळ मिळावा, यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी सुरू व्हावी, अशी विनंती केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. नियोजित वेळेनुसार ४ ऑगस्टला पहिली कसोटी खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या मागणीवर अद्याप इंग्लंड बोर्डाकडून उत्तर आलेले नाही.

दरम्यान, बीसीसीआय आग्रही असले तरी याबाबत अद्याप आमच्याशी अधिकृत चर्चा केलेली नाही,’ असे ईसीबीने शुक्रवारी स्पष्ट केले.ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मालिका एक आठवडा आधी सुरू करण्यास बीसीसीआय आग्रही आहे. यामुळे इंग्लंडमध्ये उर्वरित आयपीएल सामने खेळविण्यात बीसीसीआयला अडचणी येणार नाहीत. मात्र, अद्याप बीसीसीआयने याविषयी कोणतीही चर्चा किंवा विनंती केली नसल्याने मालिका पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल,’ असे ईसीबीने स्पष्ट केले आहे. आम्ही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन करू, असे ईसीबीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

आथरटन यांचा लेख आणि...यंदाच्या स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन न झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटी रुपयांचा फटका बसेल. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि क्रिकेट समीक्षक मायकल आथरटन यांनी एका कॉलममध्ये लिहिले होते की, आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयने पाचव्या कसोटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत विचारले आहे. त्याची माहिती घेण्यात येत आहे. पण याचा अर्थ अधिकृत चर्चा करण्यात येत आहे असा होत नाही.

टॅग्स :भारतइंग्लंड