ENG vs IND 2nd Test Match Day 5 Play Delayed Due To Rain : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडिया या मैदानातील ऐतिहासिक विजयापासून फक्त ७ विकेट्स दूर असताना पाचव्या दिवसाच्या खेळात पावसाने बॅटिंग सुरु केली आहे. परिणामी दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेत सुरु झालेला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधीच डाव घोषित करायला उशीर, त्यात गोलंदाजांना मिळालेला वेळ झाला कमी
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२७ धावा करत इंग्लंडच्या संघासमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. काही माजी क्रिटर्संनी भारतीय संघाने डाव घोषित करायला उशीर केल्याचे बोलून दाखवले आहे. त्यात आता पावसाच्या बॅटिंगमुळे भारतीय गोलंदाजांना अखेरच्या दिवशी इंग्लंडला ऑल आउट करण्यासाठी मिळालेला वेळ आणखी कमी झाला आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर किमान ८० षटकांचा खेळ होणार असल्याची पुष्टी झाली आहे. या षटकात भारतीय गोलंदाज ७ विकेट्स घेत ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी जोर लावताना दिसतील.
पावसाच्या व्यत्ययानंतर असा आहे अखेरच्या दिवसांचा प्लॅन
- सायंकाळी ५.१० ते ७ पर्यंत पहिले सत्र
- सायंकाळी ७ ते ७.४० लंच टाइम
- रात्री-७.४० ते ९.४० दुसरे सत्र
- रात्री ९.४० ते १० पर्यंत टी ब्रेक
- रात्री १० ते ११.३० तिसरे सत्र
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
आता टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवणं शक्य होईल का?इंग्लंडच्या मैदानात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तरी पावसाची बॅटिंग थांबली की, खेळ सुरु करायला फार वेळ लागत नाही. पाचव्या दिवसाच्या खेळात खराब हवामानामुळे तापमान २० डिग्री सेल्सियसपर्यंत असेल, असाही अंदाज स्थानिक हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे खेळ उशीराने सुरु झाला तरी ढगाळ वातावरणाचा टीम इंडियाच्या गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. याउलट इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानात टिकणं आव्हानात्मक ठरू शकते. खराब हवामानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उत्तम फायदा घेण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले तर कमी षटकातही इंग्लंडच्या संघाला ऑलआउट करणं शक्य आहे.
सिराज-आकाशदीपचा जलवा!
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज या जोडीनं दुसऱ्या कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण केली आहे. ही जोडी पाचव्या दिवशीही आपल्यातील धमक दाखवतील अन् टीम इंडिया ऐतिहासिक विजयाचा डाव साधेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असेल.