Join us

रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रियान परागने त्याच्या युट्यूबवर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचे हॉट फोटो सर्च केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:52 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू रियान परागने त्याच्या युट्यूबवर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचे हॉट फोटो सर्च केले. रियानची ही सर्च हिस्ट्री लीक झाली असून नेटकरी त्याची फिरकी घेत आहेत. अनेकांनी एआयच्या मदतीने रियानचा फोटो सारा आणि अनन्यासोबत जोडला. खरे तर व्हायरल व्हिडीओमध्ये २२ वर्षीय रियान पराग युट्यूबवर स्ट्रिमिंग करताना दिसत आहे. यादरम्यान तो कॉपी राइट फ्री म्युजिक सर्च करत होता. तेव्हा तिथे आधी सर्च केलेल्या बाबी समोर आल्या. यामध्ये 'अनन्या पांडे हॉट', 'सारा अली खान हॉट', असे दिसले.

रियान पराग अभिनेत्रींचे हॉट फोटो सर्च करत असल्याचा दाखला देत नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल केले. रियान पराग आणि वाद हे समीकरण नवीन नाही. आयपीएलमध्ये एकदा त्याचा मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलसोबत वाद झाला होता.

वरिष्ठ खेळाडूंसोबत पंगा घ्यायला तो मागे पुढे पाहत नाही. मागील वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने मी वरचा दर्जा खेळाडू असल्याचा इशारा केला होता.

दरम्यान, रियान पराग टीम इंडियात स्थान मिळवण्याचा दावा करणाऱ्यांपैकी एक दावेदार आहे. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी अप्रतिम आहे. त्याने आयपीएल २०२४ च्या १६ सामन्यांमध्ये ५७३ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शेवटच्या हंगामात त्याने १० सामन्यात ५१० धावा केल्या होत्या. यामध्ये सलग ७ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात देखील त्याने चमकदार कामगिरी केली.

टॅग्स :अनन्या पांडेसारा अली खानसेलिब्रिटीऑफ द फिल्डमिम्स