Join us
Daily Top 2Weekly Top 5

करारावर स्वाक्षरी न करता इंग्लंड दौरा करणार लंकेचे खेळाडू

श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 05:32 IST

Open in App

कोलंबो : केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी अखेर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास तयारी दाखविली. मात्र त्याच वेळी त्यांनी श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) अटही घातली आहे. जोपर्यंत एसएलसी मानांकन प्रक्रियेबाबत विस्तारपणे चर्चा करणार नाही, तोपर्यंत वार्षिक करारावर आम्ही स्वाक्षरी करणार नाही, असे खेळाडूंनी एसएलसीला सांगितले आहे.श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. तसेच वार्षिक करारावर स्वाक्षरी करण्यास खेळाडूंनी आणखी वेळ लागेल असेही कळविले आहे. खेळाडूंनी ३ जूनपर्यंत केंद्रीय करारावर स्वाक्षरी न करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा हवा असेही म्हटले.

टॅग्स :श्रीलंकाइंग्लंड