Join us

आयपीएलमुळे चालंतय श्रीलंकेच्या खेळाडूचे दुकान

आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हा खेळाडू श्रीलंकेचा फिरकीपटू होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 17:48 IST

Open in App

मुंबई: खेळाडू निवृत्त झाल्यावर क्रिकेटशी निगडीत काही तरी व्यवसाय करतात. बरेच खेळाडू समालोचनाकडे वळतात. काही प्रशिक्षक होतात. पण श्रीलंकेच्या खेळाडूने चक्क एक दुकान टाकले आहे. हे दुकान आयपीएलमुळेच चांगले चालत असल्याचे या खेळाडूनेच सांगितले आहे.

आयपीएलमध्ये बरेच श्रीलंकेचे खेळाडू खेळताना दिसतात. त्यामुळे आयपीएलची क्रेझ श्रीलंकेमध्येही जबरदस्त आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेत बरीच लहानं मुलं क्रिकेटकडे वळली आहेत. त्यामुळे या मुलांना चांगली साधनं मिळावी, यासाठी हा क्रिकेटपटू धडपडत आहे.

हा खेळाडू लहान असताना त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी चेंडूही मिळायचा नाही. आपल्या जी गोष्ट लहानपणी मिळाली नाही, ती बाकिच्यांना मिळावी, हा या खेळाडूचा दुकान उघडण्यामागे हेतू होती. आता आयपीएलमुळे तर या दुकान चांगलेच चालत आहे.

आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हा खेळाडू श्रीलंकेचा फिरकीपटू होता. हा खेळाडू आहे उपुल चंदना. त्याच्या दुकानाचं नाव आहे ‘चंदना स्पोर्ट्स शॉप’.

टॅग्स :आयपीएलश्रीलंका