Shaheen Afridi Hosted Dinner: श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटानंतर, श्रीलंकेच्या खेळाडूंनी मालिका अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना संपूर्ण मालिका खेळण्यास भाग पाडलं. त्यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला पाकिस्तान सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था दिली. प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून श्रीलंकेच्या खेळाडूंचे आदारतिथ्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र याच प्रयत्नात पाकिस्तानचे दोन खेळाडू आजारी पडल्याने त्यांना मायदेशी परतावं लागलं आहे.
शनिवारी इस्लामाबादमधील पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने श्रीलंका आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. रात्रीच्या जेवणात पारंपारिक पदार्थांचा समावेश होता ज्यांचे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कौतुक केले. पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातील खेळाडूंनीही या पार्टीला हजेरी लावली. पण कर्णधार शाहीन आफ्रिदीच्या घरी जेवण केल्यानंतर श्रीलंकेचे दोन खेळाडू आजारी पडले आहेत. कर्णधार चारिथ असलंका आणि वेगवान गोलंदाज असिता फर्नांडो यांची जेवणानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना श्रीलंकेला परतावे लागले. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेतही ते सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
शाहीन आफ्रिदीच्या घरी जेवणानंतर रविवारी चारिथ असलंका आणि असिता फर्नांडो अचानक आजारी पडले. दोन्ही खेळाडूंना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना श्रीलंकेला परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे बोर्डाने असालंकाच्या जागी दासुन शनाकाला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर फर्नांडोच्या जागी पवन रत्नायकेला संघात संधी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा वादात सापडला आहे. १२ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, काही श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला. त्यानंतर, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि आसिफ मुनीर यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतली आणि श्रीलंकेच्या बोर्डाला दौरा कायम ठेवण्यास सांगितले. हल्ल्यानंतर, जेव्हा श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला, तेव्हा फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी श्रीलंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सुरक्षेच्या आश्वासनानंतरच श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने रात्री उशिरा मालिका खेळण्यास सहमती दर्शवली.
१२ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव आठ श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रीलंकेचा संघ दौरा अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतला आहे. चर्चेनंतर, श्रीलंकेच्या बोर्डाने सांगितले की ज्यांना परत यायचे आहे त्यांनी यावं आणि त्यांच्या जागी नवीन खेळाडू पाठवले जातील.