Babar Azam vs Virat Kohli : मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला

Sri Lanka vs Pakistan 1st Test : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम  ( Babar Azam) याने कामगिरीशी झगडणाऱ्या विराट कोहलीला ( Virat Kohli ) धीर देणारे ट्विट केले अन् जगभर त्याचे कौतुक झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 03:32 PM2022-07-17T15:32:10+5:302022-07-17T15:32:34+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka vs Pakistan 1st Test : Babar Azam surpasses Virat Kohli to become fastest Asian batter to score 10000 international runs, but Pakistan team collaps  | Babar Azam vs Virat Kohli : मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला

Babar Azam vs Virat Kohli : मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka vs Pakistan 1st Test : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम  ( Babar Azam) याने कामगिरीशी झगडणाऱ्या विराट कोहलीला ( Virat Kohli ) धीर देणारे ट्विट केले अन् जगभर त्याचे कौतुक झाले. विराटनेही त्याला रिप्लाय देत भारत-पाकिस्तान संबंधांपलीकडचे क्रिकेटपटू म्हणून असलेले नाते जपले. पण, सोशल मीडियावरील हे प्रेम क्रिकेटच्या मैदानावर येताच प्रतिस्पर्धीच्या रुपात बदलेले पाहायला मिळाले. बाबरची प्रत्येक खेळी ही विराटला आव्हान देणारी ठरतेय. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही तसेच काहीसे घडलेय आणि बाबरने पुन्हा एकदा विराटच्या नावावर असलेला मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला. आता आशियात असा पराक्रम करणारा बाबर हा टॉपर आहे. एकिकडे बाबरने विक्रम केलेला असताना सहकाऱ्यांनीच त्याचा घात केल्याचेही पाहायला मिळतेय... 

यजमान श्रीलंकनेने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांपर्यंत मजल मारली. दिनेश चांडिमल ( ७६), ओशाडा फर्नांडो ( ३६) व महिश तीक्शाना ( ३८) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर हसन अली व यासीर शाह यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. प्रत्युत्तरात पाकिस्तानची अवस्थाही वाईट झाली आहे. प्रभात जयसुर्याने दुसऱ्याच कसोटीत दमदार कामगिरी करताना पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४८ अशी झालेली असताना बाबर व नसीम शाह हे संघर्ष करताना दिसत आहेत. बाबर १८५ चेंडूंत ८० धावांवर खेळतोय आणि पाकिस्तानने आता १७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. 


दरम्यान, बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम या कसोटीतून केला. त्याने २२८ डावांमध्ये हा टप्पा ओलांडून विराट कोहलीचा ( २३२ डाव) विक्रम मोडला. बाबर हा सर्वात कमी डावांमध्ये १० हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा आशियाई खेळाडू ठरला आहे, तर जगभरात तो पाचव्या क्रमांकावर आहे. आशियाई खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( २४३) , जावेद मियाँदाद ( २४८) व सौरव  गांगुली ( २५३) हे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी २०६ डावांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रायन लारा ( २२०), हाशिम आमला ( २१७) व जो रूट ( २२२) यांचा क्रमांक येतो.    

Web Title: Sri Lanka vs Pakistan 1st Test : Babar Azam surpasses Virat Kohli to become fastest Asian batter to score 10000 international runs, but Pakistan team collaps 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.