नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर श्रीलंकन संघ पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
वन डे विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ -
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, पथुम निसांका, डिमुथ करुणारत्ने, सदीरा सरमविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशन हेमंथा, महेश थीक्ष्णा, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, मत्क्षीणा पथिराना, लहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.
राखीव खेळाडू - चमिका करुणारत्ने
पहिल्या सामन्यात आफ्रिकेशी भिडणार
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध पराभूत झाला होता. विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकन संघ केवळ ५० धावांत आटोपला. भारताने हा सामना १० गडी राखून आपल्या नावावर केला. लंकेचा संघ विश्वचषकातील पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला पाकिस्तानविरूद्ध श्रीलंकेचा संघ मैदानात असेल.
Web Title: Sri Lanka squad for icc odi world cup 2023 has been announced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.