Join us

लसिथ मलिंगापाठोपाठ श्रीलंकेच्या आणखी एका प्रमुख खेळाडूची निवृत्ती

श्रीलंकेचा दिग्गद गोलंदाज लसिथ मलिंगानं मंगळवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:18 IST

Open in App

कोलंबोः श्रीलंकेचा दिग्गद गोलंदाज लसिथ मलिंगानं मंगळवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिला वन डे सामना हा मलिंगाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. मलिंगापाठोपाठ आता लंकेच्या आणखी एका गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या नुवान कुलसेकराने आज निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय नुवानने 21 कसोटी, 184 वन डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017पासून नुवान वरिष्ठ संघाकडून खेळलेला नाही. त्याचा वर्ल्ड कप संघात समावेशही करण्यात आला नव्हता. त्यानं 2003 साली वयाच्या 21व्या वर्षी वन डे संघात पदार्पण केले होते. दोन वर्षानंतर त्यानं कसोटीत पदार्पण केले. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं मारलेला तो विजयी षटकार हा नुवानच्याच गोलंदाजीवर खेचला होता. त्या सामन्यात नुवानने 8.2 षटकांत 64 धावा दिल्या होत्या. नुवानच्या नावावर कसोटीत 48, वन डेत 199 आणि ट्वेंटी-20त 66 विकेट्स आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार नुवानने निरोपाच्या सामन्याची विनंती केली होती. क्रीडा मंत्रालयाने त्याला मान्यताही दिली, परंतु श्रीलंकेच्या निवड समितीनं ती फेटाळून लावली. त्याने अऩेक वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये सहभाग घेतला नसल्याचं कारण समितीनं पुढे केले आहे. 

'यॅार्करकिंग' लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती, 'हा' ठरणार अखेरचा सामना !लंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.  मलिंगाने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यातून निवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. आगामी बांगलादेश विरुद्ध होणारी वनडे मालिका लसिथ मलिंगासाठी शेवटची असणार आहे.  बांगलादेश विरुद्ध तीन सामन्यांची ही मालिका असणार आहे. मात्र, या तीनपैकी पहिल्याच सामन्यात लसिथ मलिंगा खेळणार आहे. त्यानंतर लसिथ मलिंगा आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यातून निवृत्ती घेणार आहे. याबाबतची माहिती श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करुणरत्ने यांने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.   

टॅग्स :श्रीलंकालसिथ मलिंगा