Sri Lanka Have Appointed Gary Kirsten As The New Head Coach : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर श्रीलंकन संघाला नवा कोच मिळाला आहे. भारतासह संयुक्त यजमानपदाखाली पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाच्या निराशनजक कामगिरीनंतर सनथ जयसूर्या यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. श्रीलंकन बोर्डाने त्यांच्या जागी आता भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाची नियुक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांची श्रीलंकन क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१५ एप्रिलपासून ते श्रीलंकेसोबत नवी इनिंग सुरु करतील
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकन संघाला सुपर ८ फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर जयसूर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता १५ एप्रिल पासून कर्स्टन त्यांच्या जागी श्रीलंकन क्रिकेट संघासोबतचा आपल्या नव्याा इनिंगची सुरुवात करतील. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ते श्रीलंकन क्रिकेट संघासोबत असतील, असा उल्लेखही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात केला आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ते सल्लागाराच्या रुपात नामीबियाच्या संघासोबत होते.
T20 World Cup 2026 स्पर्धेतील ५ वादग्रस्त घटना; IND vs NZ यांच्यातील फायनलमध्येही दिसली 'टशन'
२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने श्रीलंकनं खेळली मोठी चाल
गॅरी कर्स्टन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात श्रीलंकन संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. सूत्रे हाती घेतल्यावर त्यांचा फोकस हा २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर असेल. कर्स्टन यांनी याआधी भारतीय संघासह पाकिस्तानच्या संघासोबत प्रशिक्षकाच्या रुपात काम केले आहे. श्रीलंकन संघ पुढच्या दोन वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशी कामगिरी करतो, ते पाहण्याजोगे असेल.
भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा चेहरा
गॅरी कर्स्टन याच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय संघाने २०११ मध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्यांनी २०११ ते २०१३ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत काम केले. कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट संघासोबतही काम केले आहे. पण या संघासोबतचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता.कर्स्टन यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं तर १९९३ के २००४ या कालावधीत ते दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होते. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात मिळून त्यांनी १४ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात कसोटीत त्यांच्या नावे २१ तर वनडेत १३ शतकांची नोंद आहे.