कोबंलो : श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंकन क्रिकेट संघावर पुन्हा दहशतवादी हल्ला घडवण्याचे धमकी पत्र मिळाले असल्याची माहिती श्रीलंका सरकारने गुरुवारी दिली. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याबाबत फेरविचार सुरू झाला आहे. श्रीलंका क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षेचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर हा दौरा ठरला. पण, आता नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार लंकन संघावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
''श्रीलंका क्रिकेट मंडळाची आज बैठक होणार आहे. त्यात श्रीलंकन सरकार पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय होईल,''असे मंडळाने स्पष्ट केले.
![]()
दरम्यान, या दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने बुधवारी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद लहिरु थिरीमानेला देण्यात आले आहे, तर ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व दासुन शनाकाकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
एकदिवसीय संघ : लाहिरु थिरिमाने (कर्णधार), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना.
टी20 संघ : दासुन शनाका (कप्तान), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना और भानुका राजपक्षा.
Web Title: Sri Lanka Cricket to reassess security in Pakistan after terror threat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.