Join us

श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड!

या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 20:21 IST

Open in App

श्रीलंकेचे क्रिकेटपटू धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडीस आणि निरोशान डिकवेला यांच्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी आणि ६ महिने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची बंदी घातली आहे. शिवाय त्यांना प्रत्येकी १० मिलियन श्रीलंकन रुपये म्हणजे ३७ लाख २९ हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  

इंग्लंड दौऱ्यावर बायो-बबल(जैव सुरक्षा वातावरण) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या या तीन क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले होते. या तिन्ही क्रिकेटपटूंना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले होते.  इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर डरहॅमच्या रस्त्यावर हे तिघं फिरताना दिसले होते. या तिन्ही खेळाडूंचा या सामन्यात सहभाग होता.   

टॅग्स :श्रीलंकाकोरोना वायरस बातम्या
Open in App