SRH vs RR Latest News : मनीष पांडे, डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीच्या जोरावर SRHचे पुनरागमन

SRH vs RR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 05:12 PM2020-10-11T17:12:31+5:302020-10-11T17:14:25+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs RR Latest News: SRH have set 159 runs target for RR, Manish Pandey (54), David Warner (48) | SRH vs RR Latest News : मनीष पांडे, डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीच्या जोरावर SRHचे पुनरागमन

SRH vs RR Latest News : मनीष पांडे, डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीच्या जोरावर SRHचे पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले. पण, डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्या दमदार खेळीच्या जोरावर SRHनं सामन्यात पुनरागमन करताना आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. 

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ने सामन्याच्या तिसऱ्याच षटकात एका विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) कडून IPLमध्ये ३५०० धावा करण्याचा पराक्रम त्यानं नावावर केला.  

IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video

पहिल्याच षटकात वॉर्नर माघारी परतला असता, परंतु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिंमागे गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी टप्पा खाल्ला... वॉर्नर त्यानंतर सावध पवित्र्यात दिसला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टो फटकेबाजी करत होता. पाचव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बेअरस्टोनं पुल शॉट मारला आणि डिप स्क्वेअरला उभ्या असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) सुरेखरित्या तो टिपून RRला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पांडेनं IPLमध्ये ३००० धावांचा पल्ला ओलांडला.

१५ व्या षटकात जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ७३ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. आर्चर-वॉर्नर यांच्यातली ठसन या सामन्यात अनुभवायला मिळाली. आर्चरनं ३ षटकांत केवळ ६ धावा देताना वॉर्नरची महत्त्वाची विकेट घेतली. ४८ धावांवर वॉर्नरला त्यानं त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मनीषचे वादळ घोंगावले. मनीषनं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मनीषला ५४ धावांवर जयदेव उनाडकटनं माघारी पाठवले. पहिल्या तीन षटकांत केवळ ६ धावा देणाऱ्या आर्चरच्या अखेरच्या षटकात केन विलियम्सननं दोन खणखणीत षटकार खेचून १९ धावा चोपल्या. अखेरच्या षटकांत हैदराबादनं कमबॅक करताना ४ बाद १५८ समाधानकारक पल्ला गाठला.  

Web Title: SRH vs RR Latest News: SRH have set 159 runs target for RR, Manish Pandey (54), David Warner (48)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.