Join us

SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली

 IPL 2023, Marco Jansen IPL : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १४ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 20:07 IST

Open in App

srh vs pbks 2023 Live । हैदराबाद : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामातील १४ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ आपल्या घरच्या मैदानावर आज पंजाब किंग्जशी भिडणार आहे. हैदराबाद आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे, तर पंजाबचा संघ आपला विजयरथ सुरू ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पहिल्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या यजमान हैदराबादच्या गोलंदाजांनी कमाल करत पाहुण्या संघाला ३ मोठे धक्के दिले. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला पहिल्याच चेंडूत बाद करून भुवनेश्वर कुमारनेशिखर धवनच्या संघाला पहिला झटका दिला. तर मार्को यान्सनने मॅट शूट आणि जितेश शर्माने यांना तंबूत पाठवले. मॅट शूटला १ तर जितेश शर्माला ४ धावा करता आल्या. मार्को यान्सनने आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकात बळी घेऊन पॉवरप्लेमध्ये शानदार कामगिरी केली. 

खरं तर हैदराबादच्या संघाला आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा ७२ धावांनी मोठा पराभव केला. तर आपल्या दुसऱ्या सामन्यात हैदराबादला लखनौ सुपर जायंट्सकडून ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आज शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जचा पराभव करून हैदराबाद विजयाचे खाते उघडणार का हे पाहण्याजोगे असेल. तर पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा पराभव करून आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. त्यामुळे पंजाबचा विजयरथ रोखण्याचे हैदराबादसमोर आव्हान असेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सभुवनेश्वर कुमारआयपीएल २०२३शिखर धवन
Open in App