सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दहावा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीसह LSG च्या ताफ्यातील गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा रिषभ पंतचा निर्णय सार्थ ठरवला. मोहम्मद शमीने पहिल्या दोन षटकात अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड या स्फोटक फलंदाजांना अगदी स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर प्रिन्स यादव पिक्चरमध्ये आला. या पठ्ठ्यानं अप्रतिम चेंडूवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याला बोल्ड केले. दमदार फॉर्ममध्ये असलेला ईशान किशन अवघ्या एका धावाेवर तंबूत परतला. या विकेटनंतर प्रिन्स यादवच्या सेलिब्रेशनसह LSG चे संघ मालक संजीव गोएंका यांची खास झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् प्रिन्सनं गती अन् कमालीच्या स्विंगवर ईशान किशन फसवलं
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील चौथ्या षटककातील तिसऱ्या चेंडूवर उजव्या हाताचा जलगती गोलंदाज प्रिन्स यादव याने गती आणि अप्रतिम स्विंगच्या जोरावर ईशान किशनला चकवा दिला. चेंडू टप्पा पडल्यावर आतमध्ये वळला अन् ईशान किशन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न फसवा ठरला. प्रिन्स यादव याने देवाचे आभार मानत मोठ्या विकेटचा आनंद साजरा केला.
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
LSG च्या मालकांचा 'तो' फोटो व्हायरल
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक सामन्यात संघ मालक संजीव गोयंका हे स्टेडियमवर उपस्थितीत असतात. सामना गमावल्यावर ते कर्णधारासह कोचवर राग काढतात, अशी चर्चाही बऱ्याचदा रंगल्याचे पाहायला मिळते. पंजाब किंग्स विरुद्धच्या पराभवानंतरही त्यांच्यासंदर्भात उलट सुलट चर्चा रंगल्या. पण लखनौ सुपर जाएंट्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन संघाच्या पराभवानंतरही संघ मालक, कर्णधार आणि कोच यांच्यातल अगदी खेळीमेळीचं वातावर होते, हे चित्र दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. यावेळी संजीव गोएंकाची स्टँडमधील खास झलक चर्चेचा विषय ठरत आहे. संजीव गोएंका यांची तिरुपती बालाजीवर श्रद्धा आहे. ते नेहमी तिरुपती बालाजीचा छोटा फोटोसोबत बाळगतात. ईशान किशन स्वस्तात बाद झाल्यावर त्यांनी तो फोटो माथ्यावर लावत देवाचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले. स्टँडमधील त्यांची ही खास झलक दाखवणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.