SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...

SRH संघाकडून या दोघांशिवाय सगळेच ठरले फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:29 IST2026-04-05T17:25:04+5:302026-04-05T17:29:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
SRH vs LSG: 4 wickets for 26 runs! Nitish Kumar Reddy and Henry Klaasen showed class and... | SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...

SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...

IPL 2026 SRH VS LSG Heinrich Klaasen Nitish Reddy Slam Fifties : स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या घरच्या मैदानातील सामन्यात आघाडीच्या फलंदाजांमुळे चांगलाच अडचणीत सापडला होता. मोहम्मद शमीनं सलग दोन षटकात सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांनी स्वस्तात माघारी धाडल्यावर प्रिन्स यादव याने हैदराबाद संघाचा कर्णधार ईशान किशनला १ धावेवर तर दिग्वेश राठीनं लायम लिविंगस्टोनला अवघ्या १४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. २६ धावांत चार फलंदाज तंबूत परतल्यावर नितीश कुमार रेड्डी आणि हेन्री क्लासेन यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारत लखनौ जाएंट्ससमोर १५७ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नितीशकुमार रेड्डी आणि क्लासेन यांची शतकी भागीदारी 

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे SRH संघाची अवस्था ७.१ षटकात ४ बाद २६ अशी बिकट झाली होती. संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी आणि हेन्री क्लासेन ही जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावला. नितीश कुमार रेड्डीनं ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची उपयुक्त खेळी केली. क्लासेन याने ४१ चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. या जोडीनं पाचव्या विकेटसाठी ६३ चेंडूत ११६ धावांची भागीदारी रचली. १७ व्या आणि अठराव्या षटकात या दोघांची विकेट गमावल्यावर लखनौच्या गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही. परिणामी सनरायझर्स हैदाराबादचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५६ धावांवर आटोपला. 

IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’

LSG कडून गोलंदाजीत शमीचा जलवा

लखनौच्या संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत फक्त ९ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. याशिवाय प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २-२ तर दिग्वेश राठी आणि मणिमरन सिद्धार्थ  यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

तगडी फलंदाजी असलेल्या SRH संघावर आली ही वेळ 

आघाडीच्या फ्लॉप शोमुळे सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिल्या १० षटकात फक्त ४ विकेट्सच्या मोबदल्यात फख्त ३५ धावा केल्या होत्या. IPL च्या इतिहासातील पहिल्या १० षटकातील ही चौथ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली.  २००९ मध्ये कोलकाता विरुद्ध डेक्कन चार्जर यांच्यातील लढतीत १० षटकात ३ विकेट्स आणि फक्त ३१ धावा असा रेकॉर्ड आहे. एवढेच नाही तर पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त २२ धावा केल्या होत्या. ही देखील पॉवर प्लेमधील चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली. 

Web Title : SRH vs LSG: रेड्डी, क्लासेन के अर्धशतकों ने हैदराबाद को हार से बचाया।

Web Summary : LSG के खिलाफ शुरुआती विकेट गिरने से SRH लड़खड़ा गया। नीतीश रेड्डी और हेनरिक क्लासेन के अर्धशतकों ने पारी को संभाला और हैदराबाद को 20 ओवरों में 156/9 तक पहुंचाया। लखनऊ को अब जीतने के लिए 157 रनों की जरूरत है।

Web Title : SRH vs LSG: Reddy, Klassen fifties rescue Hyderabad from collapse.

Web Summary : Early wickets rattled SRH against LSG. Nitish Reddy and Heinrich Klassen's half-centuries steadied the innings, helping Hyderabad reach 156/9 in their 20 overs. Lucknow now needs 157 to win.