इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या वृद्धीमान सहानं DCच्या गोलंदाजांना धुण्याची सुरुवात केली, मग दुसऱ्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही ( David Warner) हात धूतले... वॉर्नरनं २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कागिसो रबाडाच्या एका षटकात त्यानं २५ धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
- दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, विजय शंकर, केन विलियम्सन, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, टी नटराजन
दिल्ली कॅपिटल्स - शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, तुषार देशपांडे, अॅनरिच नॉर्ट्झे
- सनरायझर्स हैदराबाद संघात तीन बदल; IN - केन विलियम्सन, वृद्धीमान सहा, शाहबाज नदीम, OUT - जॉनी बेअरस्टो, प्रियाम गर्ग, खलील अहमद
IPL 2020 पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरी
०/७७ - हैदराबाद वि. दिल्ली
१/६९ - राजस्थान वि. पंजाब
०/६३ - दिल्ली वि. बंगळुरू
०/६० - पंजाब वि. राजस्थान
सनरायझर्स हैदराबादची पॉवर प्लेमधील कामगिरी
०/७९ - वि. कोलकाता, २०१७
०/७७ - वि. पंजाब, २०१९
०/७७ - वि. दिल्ली, २०२०
यंदाच्या मोसमात पॉवर प्लेमध्ये अर्धशतक करणारा वॉर्नर पहिलाच फलंदाज ठरला.
पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारे फलंदाज
६ - डेव्हिड वॉर्नर
३- ख्रिस गेल
२ - लोकेश राहुल
२- सुनील नरीन