मुंबई - टीम इंडियाचा माजी आक्रमक आणि वादग्रस्त खेळाडू श्रीशांतची बॉडी पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. एकेकाळी अत्यंत गोंडस पण आक्रमक खेळाडू असलेल्या टीम इंडियाच्या श्रीशांतचा ताजा-तवाना लूक पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा काय बॉडी बनवलीय राव?. तर श्रीशांतची बॉडी पाहून भज्जीही आता त्याच्यासोबत खेळायचा विचार करणार नाही, असे खोचक ट्विट सिद्धार्थ झा या युजर्सने केले आहे.
मैदानातील आपल्या आक्रमक शैलीमुळे श्रीशांत नेहमीच चर्चेत राहिला आहे. पाकिस्तानी खेळाडूंसोबत अनेकदा स्लेजिंगचा प्रयत्नही श्रीशांतने केला. तर भज्जीसोबत झालेला श्रीशांतचा वादही चांगलाच गाजला होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 साली मुंबई इंडियन्सच्या हरभजनसिंगने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या श्रीशांतला थप्पड लगावली होती. मात्र, श्रीशांतची सध्याची बॉडी पाहून आता भज्जी श्रीशांतसोबत पंगा घेईल का ?, भज्जी... श्रीशांत येतोय बरं.. अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावर फिरत आहेत.
स्पॉट फिक्सींग प्रकरणानंतर श्रीशांतला क्रिकेटमधून सन्यास घ्यावा लागला. त्यानंतर श्रीशांतने आपल्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रीत केले. आता, श्रीशांत एका कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तर केम्पगोडा 2 या चित्रपटातही तो चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीशांत 'बॉडीबिल्डर' बनला आहे. दरम्यान, श्रीशांतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये तो जीम वर्कआऊट करताना दिसत आहे.