Join us  

'गंभीर' राडा! गौतम म्हणाला 'Sixer' मारतो, श्रीसंतने ऐकलं 'Fixer' अन् मग... Video 

Sreesanth VS Gautam Gambhir - गौतम गंभीर हा नेहमी चर्चेत राहणारा खेळाडू आहे... क्रिकेट खेळत असताना मैदानावरील कामगिरी आणि टशनमुळे अन् आता त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 11:25 AM

Open in App

Sreesanth VS Gautam Gambhir - गौतम गंभीर हा नेहमी चर्चेत राहणारा खेळाडू आहे... क्रिकेट खेळत असताना मैदानावरील कामगिरी आणि टशनमुळे अन् आता त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे... बुधवारी लींजंड्स लीग क्रिकेटमध्ये ( LLC) गौतम गंभीरच्या वादाची चर्चा रंगली आणि हा वाद त्याचा जुना सहकारी एस श्रीसंत याच्याबरोबर झाल्याने, क्रिकेट चाहत्यांना चर्चेचा विषय मिळाला... २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील सहकारी श्रीसंत व गौतम गंभीर यांच्यात बुधवारी राडा झालेला पाहायला मिळाला... 

LLC ही निवृत्त क्रिकेटपटूंची लीग आहे आणि गुजरात जायंट्सकडून श्रीसंत खेळतो आणि इंडियन कॅपिटल्सकडून गंभीर खेळतो... गौतमने जेव्हा षटकार व चौकार लगावला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.  या दोघांमध्ये नेमकं कशावरून वाद रंगला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गौतमने मी तुला सिक्सर मारतो असे म्हटले अन् गोलंदाजी करणाऱ्या श्रीसंतला ते फिक्सर असे ऐकू गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

गौतमने या सामन्यात ३० चेंडूंत ५१ धावा केल्या आणि इंडियन कॅपिटल्सला ७ बाद २२३ धावांचा पल्ला गाठून दिला. LLC एलिमिनेटच्या या लढतीत श्रीसंतने ३५ धावा देत १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात गुजरातला ७ बाद २११ धावा करता आल्या आणि त्यांचा १२ धावांनी पराभव झाला.    

टॅग्स :गौतम गंभीरश्रीसंत