Join us  

Breaking : 'ही' अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI ला धक्का

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:54 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह ( बीसीसीआय) देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पर्धा घेताना त्या बंद स्टेडिमयवर म्हणजेच प्रेक्षकांविनाच घ्या असे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा ही बंद दरवाजात होईल.  

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले की,''जर एखादी स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवता येत असेल तरच त्याचे आयोजन करा. तेथे अधिकाधिक लोकं जमणार नाही याची काळजी घ्या.'' बीसीसीआय योग्य ती काळजी घेईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSला सांगितले. ते म्हणाले,''खेळाच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या आणि लीगच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीवर बीसीसीआयचे नियंत्रण नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका

मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!

शारजात पुन्हा टीम इंडियाचं वादळ घोंगावलं, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं

OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द

टॅग्स :आयपीएल 2020कोरोनाबीसीसीआय