Join us  

रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यासाठी माजी क्रिकेटपटू सरसावला, केलं महत्त्वाचं विधान!

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच काळापासून भारतीय संघाचं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्त्व करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 5:31 PM

Open in App

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच काळापासून भारतीय संघाचं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्त्व करत आहे. यातच टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली भारताच्या टी-२० आणि वनडे संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अर्थात बीसीसीआयकडून ही चर्चा पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कोहलीला पूर्णपणे पाठिंबा देत तोच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून यापुढील काळातही कायम राहिल असं ठाम मत व्यक्त केलं आहे. (Split captaincy is a good idea Rohit Sharma can lead well Madan Lal)

पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी

दरम्यान, विराट कोहलीनं कर्णधारपद सोडलं तर रोहित शर्माकडे टी-२० आणि वनडे संघाचं नेतृत्त्व सोपवलं जाईल अशी चर्चा सुरू होती. आपल्या फलंदाजीकडे लक्ष केंद्रीय करण्यासाठी कोहली कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. आता विराट कोहलीला कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या विचाराला भारतीय माजी क्रिकेटपटू देखील पाठिंबा देऊ लागले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी भारतीय एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे द्यायला हवं कारण तो त्याच्या लायक आहे, असं वक्तव्य केलं आहे. तसंच कर्णधारपदाच्या विभाजनाचं त्यांनी समर्थनच केलं आहे. यामुळे कोहलीवरील दबावाचं ओझं कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार? BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान

मदन लाल यांनी केलं कर्णधारपदाच्या विभाजनाचं समर्थन"भारतीय संघाच्या कर्णधारपदाचं विभाजन हा एक चांगला पर्याय आहे. सध्या संघ चांगल्या स्थितीत आहे. आपल्याकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे पर्याय उपलब्ध आहेत हे आपलं नशीब आहे. त्यामुळे ज्यावेळी कोहलीला एक किंवा दोन प्रकारात लक्ष केंद्रीय करण्याची गरज वाटेल तेव्हा त्यानं नक्कीच कर्णधारपद सोडण्याचा विचार करण्यास हरकत नाही. त्यावेळी रोहित शर्मा संघाचं नेतृत्त्व करू शकतो आणि रोहित अनुभवी देखील आहे", असं मदन लाल म्हणाले. 

कर्णधारपदाच्या विभाजनाचा कोहलीला होईल फायदा"फलंदाजीवर लक्ष केंद्रीय करण्याच्या उद्देशानं विराट कोहली भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं मी कुठंतरी वाचलं. माझ्यामते हा चांगला विचार आहे. ही अफवा आहे की नाही याबाबत मला माहित नाही. पण कर्णधारपदाच्या विभाजनाचा कोहली आणि पर्यायनं भारतीय संघाला याचा फायदाच होईल. सध्या कोहली काय विचार करतोय यावर सारं अवलंबून आहे", असं मदन लाल म्हणाले. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मा
Open in App